परंतु भाषेवर थोडंसं नियंत्रण ठेवा; छगन भुजबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कुटुबीयांना विरोध करायचा असेल, तर तो जरुर करावा, परंतु भाषेवर थोडंसं नियंत्रण ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे. कितीही भांडणं झाली तरी रक्ताची नाती काही तुटत नाहीत, असं सांगताना भुजबळांनी ठाकरे चुलत भावंडांचं उदाहरण दिलं. कुठलीही अडचण आली, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या मदतीला धावून जातात, असा दावा भुजबळांनी केला. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ बोलत होते.”अजितदादा पवार कुटुंबात एकटे पडले आहेत का?” असा प्रश्न पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले की, “खरं तर यावर भाष्य करणं योग्य होणार नाही, पण असं दिसतंय की, अजितदादांचे बरचेसे नातेवाईक आणि भाऊ वगैरे त्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे, की तुम्हाला अजितदादांना विरोध करायचा आहे, ठीक आहे करा. कोणीतरी विरोध करतंच, कुणीही वर आलं की विरोध होतोच, करा परंतु भाषेवर थोडंसं नियंत्रण ठेवा” असं भुजबळ म्हणाले.

अजितदादांचे बरेचसे नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. तुम्हाला अजित दांदाना विरोध करायचे असले तर जरुर करा. पण विरोध करताना भाषेवर नियंत्रण ठेवा. आज राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिला तरी तुमची रक्ताची नाती तुटत नाही. आज ना उद्या तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र यावे लागणार आहे. एखाद्या कार्यक्रमास तुम्ही सर्व एकत्र याल. एकमेकांचे तोंड पाहाल. ही रक्ताची नाती तुटत नाही, हे लक्षात ठेवा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

“शेवटी राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काही तुटत नाही. आज ना उद्या परत तुम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमात कुटुंब म्हणून एकत्र यावंच लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे, एकमेकांचं तोंड बघावं लागणार आहे. रक्ताची नाती काही तुटत नाहीत” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. आमदार रोहित पवार यांनी राज्यातील एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे, असे वक्तव्य सोमवारी केले होते. तो मंत्री कृषी विभागाशी निगडीत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलतान भुजबळ म्हणाले की, एका मंत्र्यांने १६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता. तो मंत्री म्हणजे मी आहे. अंबड येथे ओबीसी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. तुमचे ओबीसीचे विचार मांडण्याचे तुम्हाला स्वातंत्र आहे, असे त्यांनी सांगितले होते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Share