आंतरराष्ट्रीय- भारताच्या युवा संघाने सलग चौथ्यांदा युवा चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यश धूल आणि शेख रशीद या जोडीच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला आहे. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला ९६ धावांनी धूळ चारली. आता शनिवारी अंतिम फेरीत भारतीय युवा संघापुढे इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
ICC U19 WC SF. India win by 96 runs and reach their fourth consecutive final! https://t.co/tpXk8oOLhY #INDvAUS
— BCCI (@BCCI) February 2, 2022
चार वेळा विजेत्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अंक्रिश रघुवंशी (६) आणि हर्नूरे सिंग (१६) हे सलामीवीर लवकर माघारी परतल्याने भारताची २ बाद ३७ अशी स्थिती झाली होती . मात्र, धूल आणि रशीद यांनी भारताला सावरले. या दोघांनी सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यावर भर दिला आणि त्यानंतर आक्रमक शैलीत खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०४ धावांची भागीदारी रचली. धूल ११० धावांवर तो बाद झाला, तर पुढच्याच चेंडूवर रशीद ९४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर दिनेशने (नाबाद २०) आणि निशांत सिंधू (नाबाद १२) अश्या धावा काढल्याने भारताने ५० षटकांत ५ बाद २९० अशी धावसंख्या उभारली ऑस्ट्रेलियासमोर उभारली होती. या धावसंख्येला गाठायला कांगारूंना फार ओढातान झाली, याचा फायदा भारतीय संघाला झाला आणि विजय आपल्या खिशात टाकला. आता ५ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना इंग्लंड विरूध्द होणार आहे , यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहण महत्वाच ठरेल.