आंध्रप्रदेश- आतापर्यंत देशात अंमली पदार्थ विरोधी अनेक कारवाई झाल्या आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचे अंमली पदार्थ या विभागाने पकडले आहेत. अशातच आंध्रप्रदेश पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आल्याच वृत्त एएनआईने ( asiannews international ) प्रसिध्द केलं आहे.
Andhra Pradesh police say it destroyed a huge quantity of cannabis worth Rs 850 crore at Koduru village near Anakapalli in the Visakhapatnam district pic.twitter.com/fUWrofEvw2
— ANI (@ANI) February 12, 2022
आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल २ लाख किलो वजनाचा आणि ५०० कोटी रुपये किंमतीचा गांजा जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी हा सगळा गांजा जाळल्याची माहिती देण्यात आली आहे. ही आंध्रप्रदेशमधली आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हंटले जात आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये आंध्र प्रदेश सरकारने ‘मिशन परिवर्तन’ ही मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी २ लाख किलोचा गांजा जप्त केला.या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत ८ हजार ५०० एकरवर असलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली आहे. एकूण १ हजार ३६३ गुन्हे नोंद करण्यात आले असून १ हजार ५०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५६२ आरोपी हे इतर राज्यातले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.