शिवसेना नेत्यांवर धाड सत्र सुरूचं

मुंबईः  शिवसेनेला मोठा धक्का, शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून त्यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरु आहे. दुसऱ्यांदा जाधव आयकर विभागाच्या रडावर आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जाधव यांच्यावर आयकर विभागान केलेली कारवाई म्हणजे, शिवसेनेला मोठा धक्का आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

यशवंत जाधव याच्यावरील आरोप
यशवंत जाधव यांच्यावरती १५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. यशवंत जाधव यांनी मनपाच्या टेंडरमधून मिळालेले १५ कोटींचे रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केलंय, यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या मास्टरमाईंड उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. त्यानंतर हे १५ कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत ,असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचे पाहायला मिळाले होते.

आमदार यामिनी जाधव यांच्यावरील आरोप
यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचे आयकर विभागाच्या या आधीच्या तपासात उघड झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी आयकर विभागाने केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचा दावा करण्यात आला होता. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मात्र तपासात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी असल्याचे स्पष्ट झाले होते.

यामिनी जाधव १ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत असल्या तरी हा पैसा त्यांचा स्वत:चाच होता, असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. महावर यांनी सन २०११-१२ मध्ये प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना केल्याचे महावर यांनी चौकशीत सांगितले होते. यात पैसा कमावल्यानंतर कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली होती. २०१९च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याडकडे ७.५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. यात २.७४ कोटींची जंगम मालमत्ता होती. तर आपले पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. यात १.७२ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.

शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर

नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे, आमदार प्रताप सरनाईक, परिवनह मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ इत्यादी नेते रडारवर असल्याने यांच्यावरती कधीही छापेमारी होऊ शकते अशी देखील चर्चा आहे. नवाब मलिकांना अटक केल्यापासून महाराष्ट्रात काल महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करण्यात आले तर भाजपकडून नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले.

कोण आहेत यशवंत जाधव
यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेत कामास सुरुवात केली. पुढे शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मधला काही काळ वगळता ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत

Share