मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी करण्यात अटक करण्यात आली आहे. ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप कार्यकर्त्यां कडून नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. गोवावाला कम्पाउंड जागेच्या सोबतच आणखी एका जागेवरुन मलिकांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल झाली आहे. मलिकांच्या अटकेनंतर एका जेष्ठ नागरिकाने केली ईडीकडे तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे. त्या ज्येष्ठ नागरिकाने तक्रारीत नवाब मलिकांवरती अनेक आरोप केले आहेत.
नवाब मलिक यांच्यावरती जागेच्या खरेदीचा आरोप केल्याने त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या आणखी चौकशी करण्यासाठी त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाल्याची पाहायला मिळत आहे. ही तक्रार एका वयोवृध्द व्यक्तीने केली असून त्यांमध्ये त्यांनी एका जागेवर मलिकांनी जबरदस्तीने कब्जा केला असल्याचे तक्रारीत म्हणटले आहे. पुर्वी या व्यक्तीने मलिकांच्या विरोधात तक्रार केली होती. परंतु त्यावेळी काहीचे झाले नाही म्हणून सध्या ज्येष्ठ नागरिकाने ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. ईडीने त्यांची तक्रार नोंद केली असून त्यासंदर्भातले सगळे पेपर त्यांनी जमा केल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे नवाब अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.