उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे आरोग्यदायी फायदे

कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो. कलिंगड वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की काही आजारांमध्ये हे फळ अजिबात खाऊ नये यामुळे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या कलिंगड खाण्याचे काय काय फायदे आहेत .

  • किडनी स्टोनचा त्रास असल्यास जरूर खा कलिंगड – ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल अशा व्यक्तींनी जरूर कलिंगड खावे. कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच किडनी साफ करण्यास कलिंगडाची मदत होते. त्यामुळे हे खाणे फायदेशीर ठरते.
  • किडनी स्टोनचा त्रास असल्यास जरूर खा कलिंगड – ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल अशा व्यक्तींनी जरूर कलिंगड खावे. कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच किडनी साफ करण्यास कलिंगडाची मदत होते. त्यामुळे हे खाणे फायदेशीर ठरते.
  • वजन कमी करण्यासाठी – वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. १०० ग्रॅम कलिंगडामध्ये केवळ ३० ग्रॅम कॅलरीज असतात. यात १ मिलिग्रॅम सोडियम, कार्बोहायड्रेट ८ ग्रॅम, फायबर ०.४ ग्रॅम, साखर ६ ग्रॅम, व्हिटामिन ए ११ टक्के, व्हिटामिन सी १३ टक्के, प्रोटीन ०.६ ग्रॅम असते.
  • इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी – कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
  • डोके थंड राहण्यास मदत – कलिंगडाची प्रवृत्ती ही थंड असते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर डोकेही थंड राहण्यास मदत होते. याच्या बिया वाटून डोक्यावर लावल्या डोकेदुखी बरी होते.
  • उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास – ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.
Share