ईडी महाराष्ट्र , बंगालला टार्गेट करतेय राऊतांचा आरोप

मुंबई-  संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत राऊतांनी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रवरच ईडीची कृपा दृष्टी आहे वाटत असा खोचक टोला केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाजावर लागवला आहे.

आयकर आणि ईडीला मी पुराव्यासह ५० नावं पाठवली आहेत. मी वारंवार उल्लेखही केला आहे. पण ईडी आणि आयकरला एक जबाबदार खासदार काही बोलत असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे असं त्यांना वाटत नाही. आमच्याबाबतीत हे बोगस ते बोगस असं म्हटलं. किरीट सोमय्याने एका केंद्रीय मंत्र्यांबाबत बोगस कंपन्यांची लिस्ट दिली काहीच झालं नाही. कोणी ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी स्वत: पाठवली. काय झालं त्याच? संपूर्ण देशात सर्वाधिक ईडीची चौकशी, कारवाई केवळ महाराष्ट्रात झाली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमधील ७ लोकांवर कारवाई झाली आहे. भाजपच्या नेत्यांवर कोणतीही कारवाई नाही. ते काय हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे का. ही भानामाती काय आहे त्याचा शिवसेना लवकरच खुलासा कणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ईडी भाजपाची एटीएम मशीन-

ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे. तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे, असे राऊत म्हणाले.

Share