ईडी भाजपची एटीएम मशीन झालीय; राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात एककेड महाविकास आघाडीच्या नेत्यांवर धाडीचे सत्र सुरु असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशीन झाले आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत अशी घोषणा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. ईडी भाजपाची ईडी मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे. तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे, असे राऊत म्हणाले.

लवकरच बाप- बेटे जेलमध्ये जाणार

किरीट सोमय्या यांनी २०१५ मध्ये मुंबई विमानतळाच्या जवळ असलेली HDIL आणि GVK या जमिनीच्या घोटाळ्या संदर्भात वारंवार एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या आहेत. २०१६ मध्ये तक्रार बंद केल्या आहे. त्यानंतर निल सोमय्या हे वाधवन सोबत निकोन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर बनले. ते आता बोलतायत माझ्या बद्दल कोणतही तक्रार दाखल झालेली नाही. लवकरच हे बाप बेटे जेलमध्ये जाणार आहे.

Share