बाप-बेटे जेलमध्ये जाणार राऊतांचा पुर्नउच्चार

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किरिट सोमय्या यांनी २०१५ मध्ये मुंबई विमानतळाच्या जवळ असलेली  HDIL आणि GVK या जमिनीच्या घोटाळ्या संदर्भात वारंवार एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी २०१६ मध्ये बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर निल सोमय्या हे वाधवन सोबत निकोन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर बनले. ते आता बोलतायत माझ्या बद्दल कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असल्याचा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थिती केला आहे. तसेच किरिट सोमय्या आणि त्याचे पुत्र निल सोमय्या हे लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचं राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले,  किरीट सोमय्यांच्या मुलाने पैसे लाटले आहे. मिस्टर ढवंगाळे यांच्या ७५ कंपन्यांनची यादी मी दिली नागपुरात आहेत ते काय कारवाई केली. देशात ईडीच्या सर्वात जास्त धाडी पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये ६० लोकांवर धाडी पडल्या आहे. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करत नाही. ईडीची जी भानामती आहे, ती कोण चालवत आहे, त्याला लवकरच शिवसेना खुलासा करणार आहे. एका दुधवाल्याने मुंबईत येईन ८ हजार कोटी रुपये कमावले आहे. त्याच्यावर ईडी कारवाई करत नाही. त्यांच्याकडे असा कोणता चष्मा आहे? असा संतप्त सवाल राऊतांनी केला.

Share