पंजाब- पंजाब विधान सभा निवडणूकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्याचबरोबर पटियाला अर्बन मतदार संघातून दोनवेळा मुख्यमंत्री असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पराभवाचा धक्का बसला आहे.याठिकाणी आपचे उमेदवार अजित पाल सिंग हे विजयी झाले आहेत. याबाबत कॅप्टन यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, जनतेचा कौल मला मान्य आहे.
I accept the verdict of the people with all humility. Democracy has triumphed. Punjabis have shown true spirit of Punjabiyat by rising and voting above sectarian and caste lines.
Congratulations to @AAPPunjab and @BhagwantMann.— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) March 10, 2022
पंजाब विधानसभा निवडणूकी आधी पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्यातील वादामूळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी स्वतः चा पक्ष स्थापन करत भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर निवडणूकीत प्रचार करत आज निकाल जाहिर झाला आणि यात अमरिंदर सिंग यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.