साखळी मतदारसंघातून सावंतांची विजयाची हॅट्रीक

गोवा : गोव्यातील साखळी मतदारसंघाकडे सगळ्यांच लक्ष लागलेले होतं. कारण या मतदारसंघात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि काॅँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात चुरशीची लढत होती. यातच मतदारसंघातून प्रमोद सावंत  विजयी झाल्याचं समोर आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा पराभव झाला आहे.  या विजयासह प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली आहे.

भाजपाला एकहात्ती सत्ता?

गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपणार आहे. गोव्यात गेल्या १० वर्षापासून भाजपची सत्ता आहे. गोव्याच्या राजकीय इतिहास पाहता, गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. १९९९आणि २०१२ विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद ठरले होते. १९९९ मध्ये काँग्रेसला २१ तर भाजपला २०१२ मध्ये २१ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली. यंदा भाजपाला एकहाती सत्ता मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Share