महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा सकारात्मक अर्थसंकल्प – अशोक चव्हाण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प मांडला आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले की, अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी १५ हजार ७७३ कोटी तर इमारतींसाठी १ हजार ८८ कोटी रूपये दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आशियाई विकास बॅंकेच्या माध्यमातून लवकरच ५ हजार कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रध्वज निर्मिती करणाऱ्या नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची नवी सुसज्ज वास्तू उभारण्यासाठी २५ कोटी रूपये, जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाच्या भूसंपादनासाठी निधी, मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा आदी या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Share