मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ईडीच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे देशमुखांना दिलासा नाहीच. आणि त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा निर्णय दिला आहे .
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर ईडी व सीबीआयने देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीने त्यांना मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.
[BREAKING] Mumbai Court rejects bail plea of Anil Deshmukh in money laundering case
report by @Neha_Jozie #AnilDeshmukh @AnilDeshmukhNCP
Read more: https://t.co/wSNV6hE0A5 pic.twitter.com/oVZUa3tJb4
— Bar & Bench (@barandbench) March 14, 2022
देशमुख यांनी नियमित जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पण हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत अद्याप सविस्तर निकाल प्राप्त झालेला नाही . पण देशमुख यांनी अर्ज करताना आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला केला होता. ईडीने या अर्जाला जोरदार विरोध केला होता. साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड केली जाण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली होती. अनिल देशमुख यांच्या विरोधात 7 हजार पानी आरोप पत्र तयार करण्यात आले आहे.