मुंबई : राज्यातील पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता देखील रद्द करण्यात येईल असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. परावा दि.१५ मार्च रोजी दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.
विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे,यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे,लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे.
काल दि. १५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले pic.twitter.com/y2RS7P6P5j
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 16, 2022
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर १ तास अगोदर पोहोचलं पाहिजे. विद्यार्थ्यांची जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात घेतलं जाणार नाही. परीक्षेचं टायमिंग १०:३० आहे तर ९:३० पर्यंत केंद्रावर पोहोचायला हवं. तर, दुपारी ३ वाजता पेपर आहे तर दुपारी २ वाजता केंद्रावर यायला हवं. या परीक्षांच्या निमित्तानं केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आम्ही गृहविभागाकडे अधिकचा बंदोबस्त मागितला आहे. माझी समाजमाध्यम आणि लोकप्रतिनिधींनी खात्री करुन बोललं पाहिजे अशी विनंती आहे. आम्ही आता हेल्पलाईन क्रमांक जारी करत आहोत. त्यांच्याशी बोलून सर्वांनी माहिती घ्यावी, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.