कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली; नितेश राणेंचा सेनेला खोचक टोला

मुंबई- एमआयएमनं महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राजकीय वर्तुळात यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे.

यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, वाह एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी आहे. महाविकास आघाडीत हिंदूत्वावर कायम शिवसेना ठाम असते. आता कट्टपंथीना पण सिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. त्यामुळे आता फक्त ईसीस कडूनच प्रस्ताव येण्याचं राहीलं आहे. यांनी खरच करून दाखवलं. असा शब्दात नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

जलील यांचे मुद्दे-

  • आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते.
  • त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे.
  • शरद पवारांना निरोप देण्याचे जलील यांनी सांगितले.
  • त्यावर आता राष्ट्रवादीची भूमिका काय याकडे लक्ष आहे.
Share