मुंडेना स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं; राणेंचा टोला

मुंबई : करूणा शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळ जनक आरोप केले असून त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. यावर आता भाजपचे नेते निलेश राणेंनी ट्टिट करत धनंजय मुंडेवर जोरदार निशाणा साधला आहे.

निलेश राणे ट्टिट मध्ये म्हणतात, धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे ११ हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का?? ह्याची आमदारकी पण रद्द होते कारण याने निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे. याला जंगलात पाठवा, पिसळलाय. अशा शब्दांत निलेश राणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिका केली आहे.

दरम्यान मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले होते. परंतु रेणू शर्माने आपले सर्व आरोप मागे घेतले होते. त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला होता.

Share