पुतीन टिकेवरून मोहित कंबोज यांचे राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई-  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट पुतीन यांच्याशी केली आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कारवायांवर बोलताना राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली. राऊत सध्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने नागपुरात असून यावेळी ते एका कार्यक्रमात बोलत होते.आपल्या देशात युद्ध नसेल पण आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसले आहेत आणि ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून बॉम्ब, मिसाईल सोडले जात आहेत. रोज एक मिसाईल येत असून आम्ही त्यातून वाचलो आहोत,” असं संजय राऊत म्हणाले यावर आता भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला आहे.

मोहित कंबोज भाारतीय यांच्या घरी काल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येवून पाहाणी केली आहे. त्यावरून त्यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, संजय राऊत दिल्लीमध्ये पुतिन आहेत की माहीत नाही पण महाराष्ट्रात मात्र किम जाॅंग उन आहेत का असा सवाल केला आहे. मोहित कंबोज हे नेहमी महाविकास आघाडीवर टिका करत असतात त्या टिंकाना अनुसरून काल महापालिकेचं पथक त्यांच्या राहत्या घरी तपासणीला आलं होतं.

 

 

Share