मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेन मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षातील नवीन प्रवत्तेपदाची यादी जाहीर केली आहे. यात मनसेचे नेते संदीप देशपाडे, प्रकाश महाजन याच्यासह अनेकांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगेश खैरे,अनिषा माजगावकर, हेमंतकुमार कांबळे, योगेश चिले यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईतील मनसे शहारध्यक्ष गजानन काळे यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज श्री. संदीप देशपांडे, श्री. प्रकाश महाजन, श्री. योगेश खैरे, सौ. अनिषा माजगावकर, श्री. गजानन काळे, श्री. हेमंतकुमार कांबळे आणि श्री. योगेश चिले यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. pic.twitter.com/3cJiD3ttON
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 25, 2022
विशेष म्हणजे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळी केल्याचा गंभीर आरोप आहेत. गजानन काळे यांची पत्नीने नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी FIR दाखल केला. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे. गजानन काळे यांचे प्रकरण कोर्टात सुरू असताना नवी जबाबदारी मिळाल्यामुळे मनसेच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.