राज्यात जिथे बांगर दिसेल तिथे त्याला घोडे लावण्याचे आदेश युवा कार्यकर्त्यांना दिले आहेत. बांगरने केलेले आरोप त्याने सिद्ध करावे. किंवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा बांगरला नांगर लावूच असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. तर एकीकडे मविआमधील मंत्र्यांची जेलमध्ये जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्याची धग आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बांगर सारखे जुगारी आमदार बाश्फळ बडबड सुरू केल्याची टीका युवा आघाडीने केली आहे.
काय केले होते संतोष बांगर यांनी आरोप
हिंगोलीचे जिल्हा शिवसेना प्रमुख बांगर यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी १ हजार कोटी रुपये घेऊन हेलिकॅप्टरने प्रचार केला. याचा फायदा भाजपला झाला. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप संतोष बांगर यांना शिवसंपर्क मेळाव्यात केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन विकास आघाडीचे महासचिव यांनी वरील वक्तव्य केलंय.