महागाईचा मोठा भडका, पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार

नवी दिल्ली : देशात सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी ८० पैशांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.०१ रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल ९२.२७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ११५.८८ रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून १००.१० रुपये झाला आहे.

देशात गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आठवेळा वाढ झाली आहे. २२ मार्चनंतर केवळ २४ मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल सहा रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share