मनसेकडून सभेची जय्यत तयारी; पुण्याहून मागवले ५० भोंगे, बडे नेते औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद : भोंग्यावरुन राजकीय वातावरण तापलेले असताना आता मनसेने आणखी कंबर कसली आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत भोंगे हटविले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने पुण्याहून आधुनिक असे ५० भोंगे मागविले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. अजुनही पोलीस आयुक्तांनी सभेच्या परवानगी बाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच आजपासून सभा होईपर्यंत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे औरंगाबादमध्ये असणार आहेत. आणि आज ते पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांसोबत देखील बैठक घेणार आहे.

मनसेचे बडे नेते ही औरंगाबाद दौऱ्यावर

मिळालेल्या माहितीनुसार मनसेचे नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे देखील औरंगाबादचा दौरा करणार आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच औरंगाबादचे राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे.

पुण्याहून मागविले आधुनिक ५० भोंगे

कतेच पुण्याहुन ५० पेक्षा अधिक भोंगे औरंगाबादसाठी खरेदी करण्यात आल्याची माहिती मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात आली आहे. औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी १५०० ते १८०० रुपये दराने पुण्यातून ५० पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी केली आहे. तसेच हे भोंगे लेटेस्ट असून या भोग्यासाठी वीज लागत नाही. ते बॅटरीवर चालतात. भोंग्यांमध्येच ऑम्लिफायर असल्याने वेगवेगळ्या मशिन जोडण्याची गरज नाही. हे भोंगे पेनड्राइव्ह आणि ब्ल्यूटूथनेही कनेक्ट होतात. त्यामुळे सीडीची गरज पडत नाही. मोबाइलवरून हवी ती गाणी लावता येतात. वजनाने हलके असल्याने सहज उचलून गच्चीवर ठेवता येतात.

Share