शहरात विमानसेवा वाढवण्यासाठी ‘औरंगाबाद फर्स्ट’ची चर्चा

औरंगाबादहून पुणे,अहमदाबाद,बंगळूर विमान सेवा सुरू करण्यात यावी यासाठी ‘औरंगाबाद फर्स्ट’ संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यासाठी औरंगाबाद फर्स्टने मुंबईत बिग फ्लाय आणि आकासा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. औरंगाबादचे महत्त्व त्यांना पटवून दिले. मुंबईनंतर औरंगाबाद सर्वात जवळच आणि मोठा विमानतळ आहे. या ठिकाणी कंपन्यांनी उभारल्यास उद्योग, पर्यटनाला वेग येईल. तसेच कंपन्यांनाही मध्यवर्ती ठिकाणी राहून देशभरात जाळे करता येईल, अशी माहिती औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष रणजित कक्कड यांनी दिली. औरंगाबादेतून पुणे, अहमदाबाद, बंगळुरूसाठी  विमान सुरू केल्यास प्रवासी, पर्यटक आणि उद्योजकांसाठी जगाची दारे सहज खुली होतील. मुंबईत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत मंगळवारी (२६ एप्रिल) झालेल्या बैठकीस औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, उद्योजक ऋषी बागला, आकाशा एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय दुबे, बिग फ्लायचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मांडवीय, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी, टुरिझम आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मुख्य सचिव वल्सा नायर, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर उपस्थित होते.

पुण्याहून औरंगाबादला येण्यासाठी बिग फ्लाय कंपनी विमानसेवा सुरू करणार आहे. या कंपनीतर्फे  छोट्या विमानांनी जवळची ठिकाणे जोडली जाऊ शकतात त्याचबरोबर नाइट पार्किंगची सुविधा सुरू करण्यात यावी असही औरंगाबाद फर्स्टतर्फे सांगण्यात आल.

पुण्याहून औरंगाबादला येण्यासाठी बिग फ्लाय कंपनी विमानसेवा सुरू करणार आहे. यासाठी पहाटे ४.३० ची वेळ ठेवण्यात येणार आहे. मात्र ती गैरसोयीची आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. सकाळी ६.३० ची वेळ केली तर प्रतिसाद मिळेल हे ही  कंपनीला पटवून देण्यात आले.

Share