कोरोनामुळे जवळपास सर्वच गोष्टी डिजीटल झाल्या आहेत. विशेषत: वर्क फ्रॉम होम मुळे लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरताना डोळ्यावर अनेक परिणाम दिसून येतात. अशा परिस्थितीत डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी व्यायाम करणे, स्क्रीन पाहताना चष्मा घालणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे पण असे काही पदार्थ आहे जे आहारात समावेश केल्याने तुमचे डोळे दिर्घकाळ निरोगी राहण्यास तसेच तुमच्या डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.
अंडी
अंड्यातील जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे, ज्यात ल्युटीन आणि व्हिटॅमिन ए (A) यांचा समावेश असतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी खरोखरच अंडी उत्तम आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ दृष्टी सुधारते.
गाजर
गाजर सॅलडमध्ये टाका किंवा त्यांचे तुकडे करा गाजर कोणत्याही स्वरूपात डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले म्हणून ओळखले जाते. अंड्यातील पिवळा भागा प्रमाणेच, गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन देखील असते जे डोळ्यांच्या संसर्गास आणि डोळ्यांच्या इतर गंभीर आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.
बदाम आणि ड्राय फुड
डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ऍसिड महत्वाचे आहेत आणि हे पोषक घटकांचा बदाममध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
मासे
जर तुम्ही मांसाहारी पदार्थांचा आनंद घेत असाल, तर नेहमीच्या चिकनपेक्षा सीफूड निवडा. कारण त्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण सर्वात जास्त असते.जे शाकाहारी आहेत ते फिश ऑइल सप्लिमेंट वापरु शकता.
हळद
हळद तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हळदीचे नियमित सेवने केल्याने डोळे कोरडे पडण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
मध
डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि मधाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मध हे एक नैसर्गिक स्विटनर आहे. मध हे तुम्हाला दिर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते.
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सीमुळे डोळयातील पडदा, पेशी वाढण्यास मदत होते. आवळ्याच्या नियमित सेवनामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते.