मुंबई : गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना विविध ग्रामीण गृगनिर्माण योजनांमधून पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देऊन ५ लाख घरकुलांचे बांधकाम मिशन मोडवर पूर्ण करण्यासाठी महाआवास अभियानाला ५ जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
राज्यात केंद्र पुसस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना ज्यात रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व त्यांना पूरक पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना, आदी राबविण्यात येत आहेत. राज्यात या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतिमान अंमलबजावणी व गुणवत्तावाढीसाठी दि. २०नोव्हेंबर, २०२१ ते १ मे, २०२२ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते व ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार व राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.
गरीब, गरजू, बेघर व भूमीहीन लाभार्थ्यांना विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधून पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देऊन ५ लाख घरकुलांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी #महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif यांनी केली.#मिशनझीरो pic.twitter.com/JWj8455IZG
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) April 29, 2022
राज्यात आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील १५ लाख ८९ हजार लाभार्थींच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून १४ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे व ११ लाख १९ हजार घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. महाआवास अभियानामध्ये ५ लाख घरे पूर्ण करण्याचा मानस असून उर्वरीत घरकुले ५ जून पर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.