नवी दिल्ली : महागाईतून दिलासा मिळण्याच्या आशेवर असलेल्या लोकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका सर्वसामान्यांना बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५०रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
The price of 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today. The domestic cylinder will cost Rs 999.50/cylinder from today.
— ANI (@ANI) May 7, 2022
मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेशा आहेत.
यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २,२५३ रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, १ मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली. देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरची महागाई त्यांना आणखी त्रासदायक ठरणार आहे.