उत्तरप्रदेश – पाच राज्याच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर उत्तरप्रदेशात पक्षांतराला चांगलाच जोर आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ आज आणखी एक माजी आमदार प्रमोद गुप्ता आणि काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे .
Former SP MLA Pramod Gupta and former Congress leader Priyanka Maurya join BJP, ahead of UP Assembly polls pic.twitter.com/5QVLBYeLGr
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 20, 2022
दरम्यान आता काँग्रेसला रायबरेलीत धक्का बसला आहे. रायबरेलीच्या आमदार आदिती सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच आदिती सिहं यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. पत्रात म्हटलं की,’मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा.
आदिती सिंह यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. विधानसभेचं सदस्यत्व यामुळे धोक्यात आलं असतं म्हणूनच त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला नव्हता.