Uttarakhand Election 22: भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उत्तराखंड- पाच राज्याच्या निवडणूका जाहीर झाल्या नंतर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत. देशात अग्रस्थानी असलेल्या भाजपाने आज उत्तराखंड राज्याच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत ५९ उमेदवारांची नावे आहेत. उरलेल्या जागांवर पक्षश्रेष्ठी विचार करून जागा वाटप करण्यात येणार आहे.

 

५९ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा-
भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेत ५९ जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली. तर  मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खतिमा मतदारसंघातून निवडणूकच्या रिंगणात उतरणार आहेत. उर्वरित ११ जागांची नावे नंतर जाहीर केली जाणार आहे. या यादीत केवळ  पाच महिला  उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच विद्यमान १० आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.
Share