‘उद्धवजी संभाजीराजेंचं आव्हान स्वीकारा, कोणी खंजीर खुपसला हे जनतेला समजेल’

मुंबई : राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धवजींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरती केली आहे.

दरम्यान राज्यसभेच्या खासदारकीवरून संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेमधील वाद चांगलाच पेटला आहे. जे मला बोलयाचं, ते बोलायची मला मुळीच इच्छा नाही, ते माझ्या तत्वातही नाही आणि रक्तातही. पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितोय, की कोणतंही शिवाजी महाराजांचे स्मारक असेल, तिथे आपण दोघंही जाऊ आणि दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांना स्मर करण करु.. आणि संभाजीराजे खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगावं. मुंबईत आल्यावर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले. या दोघांनी मला सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि उद्या तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी सरळ सांगितलं की, मी निवडणूक अपक्ष लढणार आहे.

त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला प्रस्ताव होता की, शिवसेनेत प्रवेश करावा. मी सांगितलं मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेशाला नकार दिला असं संभाजीराजे यांनी म्हटलं.

Share