संभाजीराजे छत्रपती खासदार झाले नाहीत हे दुर्देवी : नाना पटोले

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यानंतर आता त्यांच्या माघारीवर काॅँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटलं की, इतर पक्षांचे माहित नाही, परंतू संभाजीराजे राज्यसभेत जावे अशी काॅँग्रेसची मनापासूनची इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी! परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिबा राहिलं, असे म्हणतं नाना पटोले यांनी माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे घोषित केले.

संभाजीराजे काय म्हणाले?
“मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं ते म्हणाले.

Share