औरंगाबाद पोलिसांसमोर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यात वातावण चांगलेच तापले आहे. ०१ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्येही वातावरण तापताना दिसत आहे. भोंग्यावरुन औरंगाबादेत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीत मशिदीकडे भोग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने मिशीदीकडे तोंड करून अशा प्रकारचे भोंगे लावून गाणे वाजवले होते. या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांनी आता कारवाई केली आहे.

येत्या ०१ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ओरंगाबादमध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी ०३ पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. तसेच ०३ मे रोजी रमजान ईद देखील आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. राज ठाकरेंनी सभेची तारीख बदलावी, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. पण मनसे सभेचे ठिकाण आणि तारखेवर ठाम आहे. तसेच भोंगे हटवण्याच्या इशाऱ्यावरही आपण ठाम असल्याचं मनसेनं नुकतंच जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान ओरंगाबाद पोलिसांसमोर आहे.

Share