ओढ्याच्या पुरात घोड्यासह महिला वाहून गेली

लातूर / माधव पिटले : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोकणासह मराठवाड्याच्याही काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. लातुर जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले. अशातच निलंग्यातील तालुक्यातील हलगरा येथे एक दुर्घटना घडली असून ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात घोड्यासह एक महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

निलंगा तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून जात आहेत.यातच सोमवारी सांयकाळी ७ वाजता हलगरा येथील शेतकरी महिला परिवीनबी उर्फ बाई पाशामियाँ शेख वय ३२ वर्षे या आपल्या शेताकडून ओढ्याच्या पाण्यातून ओढा ओलांडून घोड्याला धरून येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती घोड्यासह पाण्यात वाहून गेली होती तिचा मृतदेह एका झाडाला ओढ्याच्या कडेला अडकेल्या मयत अवस्थेत मंगळवारी दुपारी २ वाजता सापडाला असून घोड्याचा मृतदेह त्याच ठिकाणी पाचशे मिटर अंतरावर सोमवारी सापडला आहे.परंतु पुराच्या पाण्यात वाहून गेलेली महिला अनेक तास बेपत्ता होती.पोलिस प्रशासन महसूल प्रशासन यानी अनेक तंञ वापरून सदरील वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

औराद शाहजनी पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करून शेवविच्छेदन करण्यास हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठाविला आहे.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांने मयत महिलेच्या मृतदेहाचे शेवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.पश्चात पती दोन मुले आसा परीवार असून पुढील तपास औराद शा.पोलिस ठाण्याचे पोसनि.संदिप कामत करत आहेत.

Share