‘जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा’ राहूल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

दिल्ली- पाच राज्याच्या निवडणूकींचे निकाल समोर येत यात काँग्रेसचा पाचही राज्यात सुपडा साफ झाल्याच दिसून आलं आहे.  गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने या देशावर वर्चस्व गाजवलं होतं. २०१४ पासून मात्र काँग्रेस दूसऱ्या स्थानावर गेली होती. २०१९नंतर पहिल्यांदाच पाच राज्याच्या निवडणूका झाल्या आहेत. या पाचही राज्याच्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. त्यासाठी सर्व पक्षांनी कस लावला होता. आज या निवडणूकाच्या मतमोजणीला सुुरुवात झाली असून यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याच दिसून येत आहे.त्यामुळे या निकालावर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

मात्र त्याआधीच भाजपाने चार राज्यांमध्ये तर आपने पंजाबमध्ये बहुमत मिळवले आहे. पंजाबमध्ये सत्ता असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातही काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेस बसपाच्याही मागे पडला आहे. या सर्व निकालांनंतर आता खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनादेश जिंकणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Share