नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणूकीचा निकाल भाजपसाठी धक्का देणार ठरला आहे. कारण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे असतानाच उत्तराखंडच्या जनतेने मुख्यमंत्र्यांना नाकारल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
उत्तराखंडच्या ७० जागांसाठी मतदान झाले आहे. या राज्यात कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती. भाजप विजयाच्या वाटेवर असतानाच धामी पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण ते स्वतःच निवडणूक हरले आहेत. खातिमा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद्र काप्री यांनी मुख्यमंत्री धामी यांना पराभूत केलं आहे.
भाजपाचे पुष्कर सिंग धामी यांना ३३,११५ म्हणजे ४३.७५ टक्के इतके मतदान झाले असून हरिश रावत यांना २८.०४६ म्हणजेच ३३.२६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये भाजपला ५६ जागा मिळाल्या होत्या, यावेळीही तो आकडा अजून मिळवता आलेला नाही. तसेच ही शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे हरिश रावत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राजकीय वाटचाल थांबणार का, अशी चर्चा राज्यात सुरू आहे.