अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

Share