…तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; राऊतांचं मोठं विधान

मुंबई : काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. राहुल गांधीच्या त्या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट, मनसेकडून जोरदार टिका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकरांविषयी कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य किंवा त्यांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं आहे. हे सांगितल्यानंतर आमचा विषय संपला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहेjod

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातलं वातावरण हुकुमशाहीकडे नेणारं, देशाला गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं झालं आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयावर त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. असं असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या वर्गाला वीर सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं, अशा शब्दांत संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून दोन दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये यात्रेतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. याच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं एक पत्रही दाखवलं. त्यामुळे या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Share