कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :  कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवर यांनी दिली.

एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही ४८ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी विशेष अनुदान पॅकेज मिळविताना सादर करण्याच्या कागदपत्रे व निवड पद्धतीत बदल करण्यात आले असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

याशिवाय समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवड पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Share