अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात

मुंबई : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि प्रियकर प्रतीक शाह यांनी मुंबईत लग्नगाठ बांधली आहे. हृतानं डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आलाय.

हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत २४ डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. हृताने साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

कोण आहे प्रतीक शाह ?
हिंदी मालिका विश्वात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मुक्ता शाह यांचा मुलगा म्हणजे प्रतीक. बऱ्याच हिंदी मालिकांचं दिग्दर्शन तो करतो. ‘तेरी मेरी इक जिंदगी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ या मालिकांची नावं त्याच्यासोबत जोडली जातात.

हृता आणि प्रतीची ही जोडी पाहता त्यांच्या प्रेमाच्या मालिकेचीही दणक्यात सुरुवात झाली आहे, ज्याच्या दिग्दर्शनाची धुरा नेमकी कोणाच्या हाती असणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.

Share