अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही वेळेपूर्वीच दिली होती. त्यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. छगन  भुजबळ यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

मंत्री छगन भुजबळ आपल्या मध्ये म्हणतात की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

दरम्यान,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होतीा. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गटातील मंत्री सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खात्याची फेररचना केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. या सर्व घडामोडीमध्ये अजित पवार कोरोनामुळे क्वारंटाईन झाल्यानं त्याचा परिणाम राज्य सरकारच्या कामगिरीवर होणार आहे.

Share