आलिया भट्टच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या लग्नविधींना 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेंबूरच्या ‘आरके हाऊस’मध्ये लग्नाआधीचे सोहळे होतील आणि त्यानंतर भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. 3-4 दिवसांच्या सोहळ्यानंतर हे जोडपे 17 एप्रिलला पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. येत्या 17 एप्रिल रोजी हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. या जोडप्याच्या लग्नासाठी दिल्ली आणि लखनऊ येथून खास शेफ बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर वधू आलियासाठी 25 स्पेशल वीगन फूड काउंटर्सही असतील.
मेनूमध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची असेल रेलचेल
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्ट्सनुसार, कपूर फॅमिलीला जेवणाची शौकीन आहे. त्यामुळेच नीतू कपूर यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी खास दिल्ली आणि लखनौ येथील शेफ्सची नियुक्ती केली आहे. लग्नसमारंभात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ असतील. तसेच, दिल्ली स्पेशल चाटसाठी स्वतंत्र काउंटर असेल. आलिया शाकाहारी आहे, त्यामुळे लग्नात 25 काउंटर वीगन आणि व्हेजिटेरियन पदार्थांचे असतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर-आलियाने त्यांच्या लग्नाच्या टीमकडून ‘नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट’ साइन करुन घेतला आहे. करारानुसार, टीमला जोडप्याच्या लग्नाबद्दल बोलण्याची किंवा कोणतेही फोटो लीक करण्याची परवानगी नाही. सूत्राने पुढे सांगितले की, “रणबीर-आलियाच्या लग्नात काम करणाऱ्या प्रत्येकाने म्हणजे अगदी त्यांच्या पर्सनल मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्टनेही या करारावर स्वाक्षरी केली आहे. ‘द शादी स्क्वाड’ रणबीर-आलियाच्या लग्नाचे नियोजन करत आहेत. त्यांनादेखील या करारावर स्वाक्षरी करण्यात सांगितले गेले आहे. करारानुसार, कोणालाही जोडप्याच्या लग्नाबद्दल बोलण्याची किंवा कोणत्याही प्रकारचे फोटो लीक करण्याची परवानगी नाही.”