एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या वाढदिवसानिमित्त रुद्राली पाटील यांची विशेष उपस्थिती

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात रुद्राली पाटील यांची विशेष उपस्थित

नवी दिल्ली : २१ एप्रिल रोजी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) ह्या ९६ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने नवी दिल्ली येथे ब्रिटनचे भारतातील राजदूत अलेक्स एलिस यांनी एका शानदार सोहळ्याचे आयोजन केले होते. “उद्याचे विश्व” अशी प्रमुख संकल्पना असलेल्या कार्यक्रमास लातूरच्या भूमीपुत्री रुद्राली पाटील यांना विशेष निमंत्रण ब्रिटीश दूतावासाने दिले होते.

आपल्या एन जी ओ द्वारे सर्वत्र आपल्या कामाची छाप पाडणारे ब्रिटीश दूतावास हे रुद्राली पाटील यांच्या कार्याने चांगलेच प्रभावीत झाले आहे. या आधीही २०१७ साली एक दिवसाच्या राजदूत म्हणून ब्रिटीश दूतावासाचा कारभार पाहण्याचा मान रुद्राली यांना मिळालेला आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता. मात्र, बुधवारी विशेष अतिथी म्हणून नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.

चौकट : जगातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी विचारांची देवाणघेवाण करणे आणि जगभरातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी मला ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आहे. याप्रसंगी महाराणी एलिझाबेथ यांना शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना व्यक्त केली.

Share