युक्रेनमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ; पररष्ट्र मंत्रालयाची माहिती

Russia Ukrain War : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध सुरू आहे. युक्रेनमधुन भारतात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या गोळीबारात जवळपास ११ लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

युद्धात भारतील अनेकजन युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.

खारकिव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्युने भारताला मोठा धक्का बसला आहे.

सांगायला अत्यंत दु:ख होतं आहे की, आज सकाळी खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं आहे.

Share