‘टायगर इज बॅक’ राऊतांच्या जामीनानंतर अंधारेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल १०० दिवसांनंतर राऊतांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. २ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर राऊतांना हा जमीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या जमीन नंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘टायगर इज बॅक’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११ , २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share