सोमय्यांना आणखी एक झटका, नील सोमय्यांचाही जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. किरीट सोमय्या यांना कोर्टाने आज दुसरा झटका दिला आहे. काल किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज नील सोमय्या यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला आणि हा सर्व पैसा लाटला. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत करत आहेत. तर सोमय्या यांच्याकडूनही संजय राऊतांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहे. सोमय्या विरुद्ध राऊत हे राजकीय युद्ध सध्या कायद्याच्या, पोलीस आणि कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचले आहे. पुढील काळातही हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

Share