गांधी घरातील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : काॅँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नंतर आता काॅँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना प्रोटोकॉलचा विचार करून मी स्वत: घरात क्वारंटाइन करून घेतले आहे, असंही प्रियांका गांधी यांनी सांगितलं आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘मला काही सौम्य लक्षण जाणवत असल्याने कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर पॉझिटीव्ह आली आहे. सध्या मी सर्व नियम पाळत आहे. दरम्यान, मी स्वतःला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करते असही त्या म्हणाल्या आहेत.

प्रियांका गांधी यांनी स्वत: ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोना प्रोटोकॉलचा विचार करून मी स्वत: घरात क्वारंटाइन करून घेतले आहे. गुरुवारी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली होती. सोनिया गांधी यांनी केल्या काही दिवसात अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. सोनिया गांधी यांना बुधवारी रात्री ताप आला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

गुरुवारी सोनिया गांधीही करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली होती. रणदीप सुरजेवाला म्हणाले होते की, सोनिया गांधींनी यापूर्वी ज्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यापैकी अनेकांनाही करोनाची लागण झाली आहे. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या होत्या.

Share