एका मुलीच्या आईसोबत थाटला दुसरा संसार; असे आहे अरिजीत सिंगचं खासगी आयुष्य

बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणे देणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा आज (25 एप्रिल) वाढदिवस असून तो 35 वर्षांचा झाला आहे. ‘आशिकी 2’ या चित्रपटातील गाण्यांमुळे एका रात्रीतून लाइमलाइटमध्ये आलेल्या अरिजीतने आतापर्यंत ‘तुम ही हो’, ‘आज फिर’, ‘चन्ना मेरेया’, ‘फिर मोहब्बत करने चला’, ‘ऐ दिल है मुश्किल’सह अनेक हिट गाणी स्वरबद्ध केली आहेत. अरिजीतला स्वतःच्या खासगी आयुष्याविषयी बोलणे पसंत नाही. त्याचे दोनदा लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरिजीतने त्याची बालपणी कोयलसोबत दुसरे लग्न केले.


पहिले लग्न तुटल्यानंतर खचून गेला होता अरिजीत
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अरिजीतने त्याच्या पहिल्या लग्नाबाबत खुलासा केला होता. ‘मी खूप वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. पण आता याबाबत अधिकृत घोषणा करत आहे. माझ्या आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले. पहिले लग्न तुटल्यानंतर मी खूप खचून गेलो होतो. तसेच मी खूप काही सहन देखील केले आहे. त्यामुळे पुन्हा मी तेच तेच बोलू इच्छित नाही.’

बालमैत्रिणीला बनवले आयुष्याचा जोडीदार
अरिजीतची दुसरी पत्नी कोयलसुद्धा घटस्फोटित होती आणि पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी आहे. अरिजीत आणि कोयल यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. दुस-या लग्नापासून अरिजीतला दोन मुले झाली. तर त्याची दुसरी पत्नी कोयलाला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे, जिची जबाबदारी अरिजीतने स्वीकारली आहे. 20 जानेवारी 2014 रोजी अरिजीत आणि कोयल यांचे लग्न झाले होते. बंगाली पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते.

Share