राज्याच्या मुख्य सचिवपदी श्रीवास्तव यांची नियुक्ती

मुंबई : राज्याचे मु्ख्य सचिव म्हणून गृह विभागाचे आतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवकर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सुत्रे स्वीकारली चक्रवर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीवास्तव यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

मनु कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला असून मूळचे उत्तरप्रदेशातील लखनौ येथील असणारे श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्य़ांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. श्रीवास्तव यांनी धुळे जिह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी,नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

मनु कुमरा श्रीवास्तव यांनी २२ व्या वर्षी भारतीय पोलिस सेवेत निवड झाली. राज्य सरकारने चक्रवर्ती ३० नोव्हेंबर २०२१ ला मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव  देबाशिष चक्रवर्ती यांना सहा महिन्याची  मुदतवाढ देणार होती, परंतु केंद्र सरकारने  परवानगी नाकारली.  त्यावेळी मुख्य सचिवपदासाठी श्रीवास्तव यांच्या नावाची चर्चा होती.

Share