सध्या सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्रीच्या ९ दिवस उपवास केले जातात तसेच देवींची आराधना केली जाते. पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाला काय खायचं हा प्रश्न कायम असतो आज आम्ही तुम्हाला उपवासाची एक हटके रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
१. साबुदाणा खिचडी
साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सुरूवातीला साबुदाणा पाण्यात धुवून घ्या आणि नंतर सुमारे एक तास भिजत ठेवा. त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाका आणि साबुदाणा पुन्हा एकदा एका जाड कापडावर आणखी एक तास भिजत ठेवा. पाणी संपल्यावर भिजलेला साबुदाणा, शेंगदाणे, मीठ आणि तिखट मिसळा. कढईत तूप गरम करा, त्यात जीरा, लाल मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. आता साबुदाणा घालून मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी. आवडी नुसार दही किंवा लिंबू रस घालून सर्व्ह करावे.
२. साबुदाणा टिक्की
या डिशची तयारी सुरू करण्यापूर्वी साबुदाणा धुवून १५ मिनिटे भिजवा. नंतर, एका सपाट ट्रेमध्ये शिंगाड्याचं पीठ चाळून घ्या. पिठात भिजवलेले साबुदाणा, सैंधव मीठ, मॅश केलेले उकडलेले बटाटे, धणे आणि हिरवी मिरची घाला. हे सारं मिश्रणं मिक्स करून गुळगुळीत कणिक बनवा आणि सुमारे १५ मिनिटे ठेवा. कणकेपासून पॅटीज बनवा आणि मंद आचेवर मध्यम गरम तेलात तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमागरम साबुदाणा टिक्की सर्व्ह करा.
३. शिंगाड्याचे थालीपीठ
पहिल्यांदा एका भांड्यात शिंगाड्याचे एक कप पीठ घ्यायचं. मग बारीक चिरलेले दोन शिजवलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कुट घालायचा. मग बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. नंतर त्यामध्ये एक चमच जिरे, एक चमच साखर, दोन मोठे चमचे दही आणि मीठ चवीनुसार घालायचं. मग त्यामध्ये एक चमच तेल घालून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचे. यामधले बटाटे चांगले बारीक करायचे. मग त्यामध्ये पाणी टाकून थालीपीठाप्रमाणे मळायचं. पीठ मळून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटं झाकून ठेवायचं. त्यानंतर पीठाचे गोले करून ते थापून घ्यायचं आणि तव्यावर तूपात किंवा तेलामध्ये ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही शिंगाड्याचे थालीपीठ तयार करू शकता.
४. साबुदाणा खीर
साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ धुवून भिजवून ठेवा. जितका साबुदाणा तितकेच पाणी येईल अशा पद्धतीनी भिजवा. ४-५ तासांनी साबुदाणा फुगून येईल. १ कप दुध उकळत ठेवा. दुध उकळले कि त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा अर्धवट शिजला असे वाटले कि, उरलेले दुध घाला. आणि साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत उकळत ठेवा. साबुदाणा तरंगायला लागला याचा अर्थ शिजला आहे. मग त्यात साखर,वेलची पूड आणि केशर घाला. मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवत ठेवा. दुसरीकडे एका छोट्या पातेलीत तूप गरम करा. त्यात काजू आणि बेदाणे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग उरलेल्या तुपासकट खिरीत घालून ढवळून मग सर्व्ह करा.
५. बाजरी उत्तपम
ही डिश बनवण्यासाठी, उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे धुवून घ्या आणि भिजवत ठेवा. बार्नियायार्ड बाजरी स्वतंत्रपणे ५-६ तास भिजत ठेवा. नंतर, उडदाची डाळ आणि मेथी दाणे पाण्यातून काढा आणि त्याला बारीक वाटून घ्या. त्याच कंटेनरमध्ये, बार्नयार्ड बाजरी बारीक करून घ्या आणि दोन्ही मिश्रण मिक्स करा. त्यानंतर, ते झाकणाने झाकून ठेवा आणि ६-८तास किंवा रात्रभर आंबू द्या.
पीठ तयार झाल्यावर त्यात मीठ, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले आणि जिरे मिक्स करावे. नंतर, कढईवर थोडे तेल गरम करा आणि त्यावर पिठ पसरवा. तळ तपकिरी झाल्यावर त्याला पलटवा. मध्यम आचेवर आणखी अर्धा मिनिट शिजवा. आपल्या आवडीच्या चटणी बरोबर बाजरी उत्तपम सर्व्ह करा.