निवडणुका होताच केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढ करणार – रोहित पवार

मुंबई : देशातील पाच राज्यातील निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.ती ७ तारखेला मतदान होताच होईल की निकालानंतर हे बघावं लागेल. असा टोला राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.

तसेच लोकांना दिलासा देण्याची सरकारची जर इच्छा असेल तर एक्साईज ड्युटी कायम ठेवून सेस कमी करावा.जेणेकरुन त्याचा फटका राज्यांना बसणार नाही. असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यानेही दर कमी करावेत, असं काहीजण म्हणतील, त्यांची भूमिका चुकीची नसली तरी राज्याची आजची बिकट आर्थिक स्थिती व केंद्र सरकारकडं अडकलेला हक्काचा GST चा मोठ्या प्रमाणातील निधी याचा विचार करता, आज ते शक्य होईल, असं मलातरी वाटंत नाही.अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकार १० मार्चनंतर पडेल असे वक्यव्य काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तर आज रोहित पवार यांनी पेट्रोल-डीजेल दरवाढ वरून भाजपला निशाण्यावर धरले आहे.

Share