सीतामाई मराठा मंडळातर्फे वधू-वर परिचय मेळावा

निफाड :  शहरातील सोमनथ आबा युवा फाउंडेशन आणि सीतामाई मराठा वधू-वर सूचक मंडळातर्फे दि. ६ मार्च २०२२ रोजी सीतामाई लॉन्स व मंगल कार्यालय येथे मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे.

या मेळाव्यात मराठा, कुणबी, देशमुख तसेच सकल मराठा समाजातील विवाह इच्छुक नव वधू- वर, विधूर,विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या अशा सर्वांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ मार्च २०२२ रोजी सीतामाई लॉन्स मंगल कार्यालय, खडक माळेगाव, ता. निफाड येथे दुपारी ११ ते ४ या वेळेत हा मेळावा संपन्न होणार आहे. इच्छुक वधू-वर व पालकांनी सदर मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी ७५ ८८२७०६९१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डी.के ठाकरे यांनी केले आहे.

या मेळ्याव्यात आ. अनिल कदम, माजी आ. राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, चांदवड कृऊबा सभापती आत्माराम कुंभार्डे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

Share