जेलमधून बाहेर येताच राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले….

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चढवला.आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला ईडीने जी अटक केली ती बेकायदेशीर होती असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारनी लावला. असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

काय म्हणाले संजय राऊत?
तुरुंगात राहणं काही सोपं नसतं. जेलमध्ये लोक मजेत राहत असं वाटत असेल तर तसं नाहीय. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे दिवस खूप खडतर गेले आहेत. तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलंय आणि तेही सैल होतंय. मला वाटलं तीन महिन्यांनी लोक मला विसरतील, पण लोकांचं प्रेम काल आपण पाहिलं. गेल्या तीन महिन्यांत माझ्या कुटुंबानं खूप काही गमावलं आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानं मोठा संदेश देशात गेला आहे. आपला देश १५० वर्ष गुलामीत होता तेव्हा देखील अस राजकीय वैमनस्य नव्हतं. तुरुंगात तुम्हाला भितीशी संवाद साधायला लागतो. एकाकीपणा खायला उठतो. ज्यांनी माझ्या अटकेचं षडयंत्र रचलं होतं त्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यात सहभागी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Share